पेंच व्याघ्र प्रकल्पातही काळा बिबट दिसला

December 03,2020

नागपूर : ३ डिसेंबर - ताडोबापाठोपाठ आता पेंच व्याघ्रप्रकल्पातही पर्यटकांना काळा बिबट दिसून आल्याने पर्यटकांमध्ये उत्साह आहे. २०१९मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तर २०२० मध्ये सिंधुदुर्गातील आंबोली घाटात काळा बिबट दिसून आला.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना पुन्हा काळा बिबट दिसून आला आहे. गेल्या महिन्यातच पेंचमध्ये पहिल्यांदा काळा बिबट पर्यटकांना दिसला होता. मात्र, अवघ्या काही सेकं दासाठी तो दिसल्याने त्याचे छायाचित्र किं वा चित्रफित पर्यटकांना घेता आली नाही. यावेळी मात्र पर्यटकांनी चित्रित के लेल्या चित्रफितीत बिबट स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत सामान्य पिवळ्या-काळ्या ठिपक्यांचा बिबट देखील दिसत आहे. पेंच मध्यप्रदेशातील तुरीया गेटजवळ पर्यटकांना बराचकाळ बिबट दिसून आला. त्यावेळी पर्यटकही आश्चर्यचकित झाले. ताडोबात पहिल्यांदा काळा बिबट दिसून आला तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र, काळा बिबट हा सर्वसाधारण बिबटच असून ती वेगळी प्रजाती नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट के ले. शरीरात ‘मॅलेनीन’ रंगद्रव्य अधिक झाल्यास हा काळा रंग प्राप्त होतो आणि काळ्या रंगामुळे ठिपके  दिसून येत नाहीत. आतापर्यंत ताडोबात काळा बिबट पाहण्यासाठी पर्यटक येत होते. आता पेंचमध्येही तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.