लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या पोलीस शिपायास १० वर्षाचा कारावास

January 13,2021

गडचिरोली : १३ जानेवारी - प्रेमसंबंध जुळवून, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्या पोलिस शिपायास जिल्हा सत्रन्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी १0 वर्षाचा सर्शम कारावास व ८0 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद शांताराम बावणे (३५) रा. आरमोरी असे आरोपी पोलिस शिपायाचे नाव आहे. 

पीडिता हा २0१0 मध्ये दहाव्या वर्गात शिकत असताना आरोपी विनोद बावणे याने तिच्याशी प्रेमसंबंध जूडवून तसेच तिला लग्नाचे आमिष दाखून १८ मार्च २0११ रोजी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. तसेच शारीरिक संबधाचे व्हिडीओ शुटींग करून ठेवले. सदर व्हिडीेओ पीडिताच्या आई-वडीलांना दाखवतो असे म्हणून २0१५ पर्यंत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पीडिताने आरोपीला लग्न करण्यासाठी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु विनोद दुसर्या मुलीशी ६ मे २0१५ रोजी लग्न केल्याने पीडित मुलीने २५ ऑगस्ट २0१५ रोजी आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विनोद बावणे याच्यावर २९ ऑगस्ट २0१५ रोजी ४८/२0१५ अन्वये गुन्हा दाखल करून १७ ऑक्टोबर २0१५ रोजी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक शरद पाटी यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

न्यायालयाने पीडिताचे व संबंधीत साक्षदारांचे बयाण नोदूवन सरकारी पक्षा युक्तीवाद ग्राह्य माणून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आज १२ जानेवारी रोजी आरोपीस कलम ३७६(२) व कलम ५0६ भादंवि अन्वये दहा वर्ष सक्षम कारावास व ८0 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रकमेतील ७५ हजार रूपये पीडितेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारीत केला. 

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अँड. एस. प्रधान यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.