कृषी कायद्याविरोधात वाशिममध्ये होणार साखळी उपोषण

January 19,2021

वाशीम : १९ जानेवारी - कृषी कायद्याविरोधात मागील ५0 दिवसापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी संपुर्ण भारतात गोरसेनेच्या वतीने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बुधवार, २0 जानेवारीपासून गोरसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला व पुरुषांच्या उपस्थितीत साखळी उपोषण सुरूहोणार असल्याची माहिती गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष आशिष राठोड यांनी दिली. 

यासंदर्भात गोरसेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राठोड यांनी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. निवेदनात नमुद आहे की, मागील ५0 दिवसापासुन दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू असून, या शेतकरी आंदोलनात जवळपास ८0 शेतकरी शहीद झाले आहेत. या कायद्यासंदर्भात सरकारसोबत अनेक वेळा चर्चा बैठका होऊन सुद्धा कोणतेही ठोस निर्णय झालेला नाही. तसेच या शेतकरी अंदोलनाला सरकारने तसेच न्यायालयाने दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या शेतकरी आंदोलनाच्या सर्मथनार्थ संपूर्ण भारतात गोर सेनेच्या वतीने कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणाला बसणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २0 जानेवारीपासून महिला व पुरुषांच्या सहभागातून साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष आशिष राठोड, मानोरा तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष उल्हास राठोड, गोपाल चव्हाण आदींनी दिली.