वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा शेतकऱ्यांची मागणी

January 19,2021

यवतमाळ : १९ जानेवारी - झरी तालुक्यातील मांडवी, जुनोनी, पिवरडोल शिवारात वाघांचा धुमाकूळ सुरुच असून परिसरात ५ वाघ असल्याचे बोलले जाते या वाघांच्या दहशतीमुळे शेतीची काम करणे कठीण झाली असून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.१७ जानेवारीला दुपारी १२ वाजता गजानन वाडगुरे, हे शेतात तुरी मोडत असतांना शेजारी तीन शेळय़ा होत्या. तितक्यात तेथे एका वाघने शेळीला ठार केले. दोन शेळय़ा पळत सुटून घरी परतल्या. सदर घटना जुनोनी शिवारात घडली. दुपारी ३:३0 वाजता शंकर कांचन वाटगुरे यांचे शेतात दोन वाघ शिरले. 

आदित्य याने वाघांना बघताच आरडाओरड केली. वाघांनी थेट बांधलेल्या ९ बैलांकडे मोर्चा वळविला ६ शेतकर्यांनी एकत्र येऊन बांधलेली ३ बैल सोडली ६ बैल व्यसन सोडून पळून गेली. मात्र एका गोर्ह्यावर वाघने झडप घातली, मात्र या हल्यात गोर्हा वाचला शेतकर्यांनी हिंमत करुन एकत्र येऊन बैलांना वाचविले मात्र वाघ ठिय्या मांडून तसेच बसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शिवारातील आपबीती शंकर निकोडे, शंकर वाडगुरे, सुरेश भेंडारे, अनिल वाडगुरे, भास्कर वाडगुरे, केशव ठाकरे, किसन सिडाम, गजानन कार्लावार, र्शावण रामटेके, गंगाराम किनाके, भगवान कार्लावार, रवि कार्लावार आदींनी सांगितली व वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.