बिबट्याने केली गोठ्यात बांधलेल्या वासराची शिकार

January 19,2021

गोंदिया : १९ जानेवारी - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथील निलकंठ शेंडे या शेतकर्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरूचे बिबट्याने शिकार केला. या घटनेमुळे राजोली परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी धस्तावलेल्या नागरिकांकडून केली जात आहे. 

मागील काही दिवसांपासुन राजोली परिसरातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहेत. त्यातच आता बिबट्या गावात शिरून जनावरांची शिकारही करू लागला आहे. या प्रकाराचा  प्रत्येक्ष प्रत्येय आला आहे. राजोली येथील निलकंठ शेंडे यांच्या घराजवळच्या गोठ्यात बांधलेल्या वासरूची बिबट्याने शिकार केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या जनावरांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गावातून पळ काढला. मात्र या घटनेमुळे राजोली परिसरात चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहा. पठाण, वनरक्षक साखरे, सोंडगीर, दाभोळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे बिबट्याचे बंदोबस्त करावे, अशी मागणी गावकर्?यांकडून केली जात आहे.