अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाई ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

January 19,2021

गोंदिया : १९ जानेवारी - तिरोडा पोलिसांनी मागील १५ दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत जवळपास ७0 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्राम निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्व संध्येला ६ ठिकाणी छापामार कारवाई करून १0 लाख ६४ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकंदरीत तिरोडा तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांचे तिरोडा पोलिसांच्या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

तिरोडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांनी कारभार सांभाळताच अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा सत्र सुरू केला आहे. १७ जानेवारीच्या रात्री पोलिस पथकाने ६ अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी छापामार कारवाई केली. दरम्यान तरासन बरयीकर यांच्याघरून १९२0 किलो सडवा मोहफूल असा एकूण १ लाख ५९ हजार ६00 रुपया किंमतीचा मुद्देमाल, शिला खरोले हिच्या घरून १४४७ किलो मोहफुल यासह १ लाख १५ हजार २00 रुपया किंमतीचा मुद्देमाल, वनमाला झाडे हिच्या घरून २१६0 किलो सडवा मोहफूलासह १ लाख ७२ हजार ८00, शामराव झाडेच्या घरून १२८0 किलो सडवा मोहफुलासह १ लाख १७ हजार ४00 रुपये किंमतीचा मुद्देमाल, कलीम गफूर पठान यांच्या घरून ३२४0 किलो सडवा मोहफुलासह २ लाख ५९ हजार २00 रुपये किंमतीचे तसेच साबीर पठान यांच्या घरून ३ हजार ८0 किलो सडवा मोहफुलासह २ लाख ४६ हजार ४00 रुपया किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकंदरीत सहा कारवाईमध्ये १0 लाख ६४ हजार ४00 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. योगेश पारधी, सपोनि. हनवते, पोउपनि. राधा लाटे, पो.हवा. दामले, चेटुले, श्रीरामे, बर्वे, वाढवे, मडावी, पंकज सवालाखे, चोपकर, प्रशांत कहालकर, गुड्डू हरिणखेडे यांनी केली.