क्रिकेट खेळताना विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू

January 19,2021

नागपूर : १९ जानेवारी - क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अजनीतील ओंकारनगर मैदानात  सकाळी घडली. रमण दिलीप गायकवाड (२५, रा. धाडीवाल ले-आउट) असे मृतकाचे नाव आहे. तो बीसीए अंतिम वर्षाला शिकत होता. सोमवारी सकाळी रमण व त्याचे मित्र ओंकारनगर मैदानात क्रिकेट खेळत होते. अचानक रमणची प्रकृती खालावली. मित्रांनी त्याला घरी नेले. नातेवाइकांनी रमणला रामदासपेठेतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोवाडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.