बुलढाण्यात लवकरच मुलींचे निरीक्षण गृह निर्माण करणार - यशोमती ठाकूर

January 24,2021

बुलडाणा : २४ जानेवारी - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचार व कुमारी माता मुलीना अकोला, अमरावती, औरंगाबाद येथे निरीक्षण गृहात पाठवावे लागले. त्यासाठी बालसंरक्षण समितीला अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हयात मुलींचे निरीक्षण गृह व्हावे या मागणीला दुजोरा देत बुलडाणा येथे लवकरच निरीक्षण गृह सुरू करण्यात येईल अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.. 

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी आज 23 जानेवारी रोजी बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळ त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. बालगृहात झालेल्या आत्महत्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली.

 यावेळी त्यांच्यासमावेत जि.प अध्यक्षा मनिषा पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प सदस्य जयश्री शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रामरामे, महिला व बालविकास अधिकारी  सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.