अनोळखी इसमाने बाप-लेकाला लुटले

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - नागपुरात कपडे खरेदी करायला आलेल्या बापलेकाची गावाला जायची बस सुटली. अनोळखी इसमाने गावाला सोडून देण्याच्या नावावर त्यांना कारमध्ये बसविले आणि काही अंतरावर नेऊन एका शेतात त्यांच्याजवळील मुद्देमाल चोरून त्यांना तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सिंधी कॉलनी, गोंदिया येथील राहणारे प्रवीण प्रभुदास बजाज (४0) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा आर्यन हे २१ जानेवारीला कपडे खरेदी करण्यासाठी नागपूरला आले होते. कपडे खरेदी करून ते गोंदियाला जाण्याकरिता गणेशपेठ हद्दीत मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. रात्रीचे ११ वाजले असल्याने बस निघून गेली होती. त्यामुळे प्रवीण हे तेथेच बसून होते. दरम्यान, एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला की गोंदियाला जायचे आहे का, असे विचारले. प्रवीण यांनी होकार दिला असता त्या इसमाने प्रवीण यांना जाधव चौक येथे पांढर्या रंगाची वॅगनार गाडी क्र. एमएच/२७/ डीए/0५0७ ही गाडी उभी होती. त्या इसमाने प्रवीण यांना त्या गाडीत बसायला सांगितले. गाडीत आधीच दोन अनोळखी इसम बसले होते. प्रवीण आणि त्यांचा मुलगा गाडीत बसला. चालकाने गाडी पुढे नेली. काही वेळानंतर चालकाने गोंदिया रस्त्याने न नेता हुडद गाव येथील एका श्ेातात नेली आणि फिर्यादीला र्छेवाली बंदूक दाखवून प्रवीणजवळचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि नगदी २,५00 रु. असा एकूण ८७,५00 रु.चा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. चालक आणि त्याच्यासोबत असलेले इसम प्रवीण आणि त्यांच्या मुलाला तेथेच सोडून पळून गेले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.