रिझर्व्ह बँक १००, १० आणि पाच रुपयाच्या नोटा बंद करणार?

January 24,2021

नवी दिल्ली : २४ जानेवारी - पुढील काही दिवसांत भारतीय रिझर्व्ह बँक 100, 10 आणि पाच रुपयांच्या जुन्या नोटा चलनाबाहेर काढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी याबाबत माहिती दिली. 

 रिझर्व्ह बँकेने सन 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. मात्र, नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. सर्वप्रथम नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील. त्यामुळे येत्या एप्रिलनंतर जुन्या नोटा चलनात नसेल. तसेच, या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून 10 रुपयांच्या नाण्यांविषयी देशभरात वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असून, काही व्यापारी वा दुकानदार हे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यावर अशा अफवा टाळण्यासाठी बँकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यामुळे लोकांनी 10 रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.