राज्यमंत्री स्वतः खेळले कबड्डी

January 24,2021

अमरावती : २४ जानेवारी - राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केल्याचे समोर आले आहे. अमरावतीच्या चांदुर बाजारमध्ये गो.सी. टोम्पे महाविद्यालयात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः मैदान उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला.

आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांचा त्यांच्या बेलोरा गावात कबड्डी खेळाचा संघ होता. त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. अशाच प्रकारे चांदुर बाजारमधील एका महाविद्यालयात कबड्डी सामन्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या बच्चू कडू यांनी खेळाडी भूमीका पार पाडली.

दिवाळी सणाची सुरवात प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करत असतात. यानुसार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दिवाळीची सुरुवात ही दरवर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांना आंघोळ घालून त्यांना नवे वस्त्र दान करून सुरू होते. यंदाही त्यांनी अमरावतीच्या मधुबन वृद्धाश्रमात वृद्धांना उटणे लावून अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना नवे कपडे आणि पुरणपोळीचे जेवणही वाढले. त्या अगोदर लॉकडाऊनच्या दरम्यान, रस्त्याच्या कडेला मूगाच्या शेंगा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाकडून त्यांनी सर्व शेंगा खरेदी केल्या होत्या.