तहसील पोलिसांनी केला पिस्तुलधारी गुन्हेगाराचा पाठलाग, शेवटी गुन्हेगार अटकेत

January 24,2021

नागपूर : २४ जानेवारी - चोराच्या मागे पोलिस धावतात तर कधी कारने पाठलाग करतात. चोर-पोलिसांचे असे दृश्य अनेक चित्रपटांत आहेत. अगदीच त्याचप्रमाणे तहसील पोलिसांनी पिस्तूलधारी गुन्हेगाराचा गांधीबागेतील मार्गावर पाठलाग केला. ही फिल्मीस्टाईल कारवाई तहसील पोलिस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली. नोगल पाटील (२८) रा. जुनी मंगळवारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर हे पथकासह रात्री गस्तीवर होते. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून त्यांनी पेट्रो मोबाईलवरील तपास पथक सज्ज ठेवले. पथकाला एका पांढèया रंगाची कार समोरून येताना दिसली. त्या वाहनास पोलिसांनी थांबविले असता, कारचालकाच्या जवळ बसलेली व्यक्ती पळून गेली. पोलिस पथकाने पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. मात्र, कारचालक पोलिसांना हुलकावणी देत गांधीबागेतील रस्त्याने वाहनासह पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक केलेल्या नोगलची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळाले.

 चौकशीत त्याने नाव, पत्ता सांगितला. पोलिसांनी त्याला कारसह पळून जाणाèया इसमाचे नाव विचारला. पिस्तूल कुठून आणले यावर त्याने पळून गेलेल्या कुलदीपची पिस्तूल असल्याचे सांगितले. ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक राऊंड असा एकूण ३१ हजार रुपयांचा माल आढळला. आरोपीविरुद्ध कारवाई करून अटक करण्यात आली.

 आरोपी नोगल याला शनिवारी न्यायालयात हजर करून त्याची पोलिस कोठडी मिळविली. पळून गेलेला त्याचा साथीदार कुलदीप ऊर्फ पिन्नु पांडे (३०) रा. गिट्टीखदान याचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेतला असता तो गड्डीगोदाम येथील गोलबाजार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने शनिवारी दुपारी गोलबाजारात घेराव करून त्याला पकडले. त्याच्याजवळून कार जप्त करण्यात आली.

 ही कारवाई अपर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त लोहित मतानी, सपोआ परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जयेश भांडारकर, पोलिस निरीक्षक बलिरामqसग परदेसी, पोहवा समीर शेख, रवींद्र पाटील, नापोशि नाझीर शेख, पोशि सचिन नितवणे, प्रवीण लांडगे, हेमंत पराते, पंकज बागडे, युनूस खान, अजित ठाकूर, नितीन राठोड यांनी केली.

अनेक गंभीर प्रकरणात लिप्त असलेल्या पिन्नु पांडेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पिन्नु व त्याचा साथीदार कुख्यात असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुंडाच्या टोळीसोबही त्यांचे वैमनस्य आहे. पोलिसांनी सज्ज राहून कर्तव्यदक्षतेचा परिचय देत अग्निशस्त्रासह त्याला ताब्यात घेतले. दोघांच्याही अटकेमुळे पुढील गंभीर गुन्ह्यावर आळा बसला. अग्निशस्त्र कुठून आणले याचा तपास सुरू आहे.