संशयास्पद युवकांकडून जप्त केला १ लाख २१ हजारांचा गांजा

January 28,2021

यवतमाळ : २८ जानेवारी - पाटणबोरी येथील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आदिशक्ती धाब्यावर तीन व्यक्ती ट्रक ची वाट पाहताना दिसून आले .या तिन्ही युवकांवर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता युवकांनी उडवाउडवीची ची उत्तरे दिली. त्यांचेकडे असलेल्या बॅग बदल विचारले असता ते घाबरले. पोलिसांना संशय आला व त्यांनी बॅग तपासणी केली असता त्यात गांजा सदृश वस्तू आढळली. याबाबत युवकांना विचारले असता सदर वस्तू गांजा असून आम्ही उत्तर प्रदेश येथे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सदर घटनेची माहिती जमादार शर्मा यांनी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना दिल्ली पांढरकवडा ठाणेदार आपल्या टीम सोबत घटनास्थळावर दाखल झाले. तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी अंशू संजीव कुमार गुप्ता वय २४ राहणार खुदागंज ठाणा तालुका कमालगंज जिल्हा, फारुखाबाद उत्तर प्रदेश अभय प्रताप सिंग उर्फ शुभम रामनरेश सिंह वय २३ राहणार अकमेलपुर तालुका कमालगंज फरुखाबाद उत्तरप्रदेश, विजय सिंग जयवंत सिंग वय २१ राहणार माजगाव तालुका कमालगंज जिल्हा फारुखाबाद उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली . असता त्यांचेकडे १२ किलो २३९ ग्राम गांजा किंमत १,२१,२00 तसेच ४00 रुपये किमतीची बॅग सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत १८00 रुपये पॅनासोनीक कंपनीचा मोबाईल किंमत ३ हजार रुपये रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत ८ हजार रुपये व नगदी ३ हजार ५६0 रुपये एकूण किंमत १ लाख ३७ हजार ९६0 किंमत चा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक ,एस डी पी ओ पाटील साहेब यांचे मार्गदर्शनात ठाणेदार राम कृष्ण महल्ले साहेब ,पीएसआय वारिंगे, ए एस आय नाकतोडे ,जमादार सुशील शर्मा ,जमदार वसंता चव्हाण ,साहेबराव बेले, अफजल पठाण ,बारेकरे ,राजू बेलेवार आदींनी केली.