अनैतिक संबंधातून पोलिसांनी जीव गमावला

January 28,2021

भंडारा : २८ जानेवारी - विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून एका पोलिस कर्मचार्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना रात्री १२ वाजताच्या सुमारास गणेशपूर येथे घडली.

महेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वॉर्ड, साकोली असे मृत पोलिस कर्मचार्याचे नाव असून तो साकोली पोलिस ठाण्यात कार्यरत होता.

घटनेच्या रात्री महेश हा महिलेच्या बेडरुममध्ये बाल्कनीतून आत आला. त्याने महिलेशी 'माझ्यासोबत बोलत का नाही, भेटत का नाही', असे बोलून आपल्या अंगावरील कपडे काढून तो महिलेसोबत गप्पा करीत होता. तेवढय़ात महिलेचा पती येत असल्याची चाहूल लागताच महेश घाबरून बेडरुमला लागून असलेल्या बाल्कनीत गेला. दरम्यान बाल्कनीतून खाली उतरत असताना तोल जाऊन त्याचा पाय घसरला. आणि सिमेंट रस्त्यावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी र्मग दाखल केला असून तपास पोलिस उपनिरीक्षक जटाळ करीत आहेत.