नागपूर विद्यापीठात गणतंत्रदिनी शैक्षणिक पुरस्कार केले प्रदान

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. 

विद्यापीठ गीत आणि दीप प्रज्वलनानंतर पुरस्कार वितरीत करण्यात आले. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार वर्धेचे डॉ. ओम महोदया यांना देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. के. जी. रेवतकर तसेच डॉ. संतोष जाजू यांना देण्यात आला. उत्कृष्ट संशोधक गटात औषधनिर्माण शास्त्र विभागाचे डॉ. निशिकांत राऊत, पदार्थविज्ञान विभागातील डॉ. सुभाष कोंडावार यांना तर उत्कृष्ट लेखक पुरस्कार डॉ. गणेश चव्हाण, डॉ. कृष्णकुमार स्मृती सुवर्णपदक डॉ. आरती मोगलेवार यांना प्रदान करण्यात आले. 

या कार्यक‘मात अधिसभा सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय मुनीश्वर यांचा विद्यापीठातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. सुभाष चौधरी यांनी, प्रेरणादायी काम म्हणून यातून इतरांनी प्रेरणा घेण्यासाठी या कार्यक‘माचे आयोजन असल्याचे सांगितले. संचालन अमृता इंदूरकर यांनी तर आभारप्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले.