अजनी यार्डात इंजिनाची सहा चाके रुळावरून घसरली, बॅटरी बॉक्सला धडक

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - मुंबईहून आलेले सेवाग्राम एक्सप्रेसचे  डबे यार्डात घेऊन जाताना इंजिनाची ६ चाके रूळावरून घसरली. ही घटना नागपूर- अजनी दरम्यान यार्डात घडली. रेल्वे रूळाशेजारी असलेल्या बॅटरी बॉक्सला इंजिन धडकले तर ‘ओएच' खांब तुटले. स्थानिक गाड्यांची देखभाल आणि दुरूस्ती यार्डात केली जाते. नेहमीप्रमाणे मुंबईहून आलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसचे डबे सायंकाळच्या सुमारास अजनी यार्डात घेऊन नेले जात होते. 

सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास नागपूर - अजनी यार्डादरम्यान हॉटेल हरदेवजवळील पुलावर अचानक इंजिनाची ६ चाके रूळाखाली आली. विशेष म्हणजे इंजिनाचा बहुतांश भाग रुळ सोडून बाहेर पडला. या घटनेमुळे रेल्वे रुळाशेजारील इंजिनाला वीज पुरवठा करणारे ‘ओएचईङ्क खांब तुटले. या शिवाय बॅटरी बॉक्सलाही धडक बसली. वीज पुरवठा करणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याने याचा प्रभाव मुख्य मार्गावरही झाला. यावेळी विदर्भ एक्स्प्रेसला थोडा उशिर झाला. ओएचई खांबाच्या दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडित करावा लागला. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर ओएचई खांबांची दुरूस्ती करण्यात कर्मचाèयांना यश मिळाले. 

माहिती मिळताच मदत वाहन आणि कर्मचाèयांनी घटनास्थळी धाव घेतली. ओएचई खांबाची दुरूस्ती झाल्यानंतर इंजिनाला रूळावर घेण्यासाठी बराच वेळ लागणार होता. मात्र, अनुभवी कर्मचाèयांनी कौशल्य दाखविल्याने अवघ्या पाच मिनिटात इंजिन रूळावर घेता आले. वरिष्ठ अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरळीत करण्यात आले.