महाकवी सुधाकर गायधनी आता आंतरराष्ट्रीय शांतिदूत

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - भूतान येथील विश्वसाहित्य ,शांतता आणि मानवाधिकार मंच (वर्ल्ड लिटररी फोरम फॉर पिस अँण्ड ह्य़ुमन राईट ) या जागतिक संस्थेने महाकवी सुधाकर गायधनी यांना 'आंतरराष्ट्रीय शांतीदूत ' (इंटरनॅशनल एंबेसेडर ऑफ पिस) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्यातून जागतिक मानवाधिकार आणि शांततेची मांडणी करणार्या साहित्यिकाला शांतीदूत पुरस्काराने सन्मानित करणार्या या संस्थेचे भूतान येथील डॉ. बिस्वा हे संस्थापक आहेत. या पुरस्कारासाठी निवड समितीच्या आंतरराष्ट्रीय सदस्या रोमानियन कवयित्री लेनूस यांनी गायधनीं यांच्या नावाची शांतीदूत पुरस्कारासाठी शिफारस केली होती. गायधनी यांचे 'देवदूत' महाकाव्य रोमानियन भाषेत प्रकाशित झाले आहे. डॉ. ओम बियाणी यांनी महावाक्य एक अभिजात महाकाव्य या शिर्षकाने केलेल्या इंग्रजी समीक्षणाची इंग्लंडच्या 'द पोयट' या वेब मासिकाने आंतरराष्ट्रीय प्रसारणासाठी निवड केली आहे.