शंकरपाळया आणि कारल्याचा कडू गोड वाद होतो आहे सोशल मीडियावर व्हायरल

January 28,2021

बुलडाणा : २८ जानेवारी - सोशल मिडीयाच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. जगभरात दररोज काही न काही गमतीजमती घडतात. अशीच एक गंम्मत बुलढाणा जिल्ह्यातील कळमेश्वर गावात घडली होती.

त्याच झालं असं की शंकर आणि कार्तिक नावाचे मित्र खेळता खेळता अचानक भांडायला लागले. भांडता भांडता त्यांनी एकमेकांना नावावरून चीड पाडली. त्यातील कार्तिकने शंकरला ‘अय.. शंकरपाळ्या’ म्हणून चिडवलं. मग काय शंकरने फिल्मी स्टाईलमध्ये त्याला दम दिला आणि उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडीओ काढून फेसबुक शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे भांडण महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या भांडणावरून फेसबुकवर अनेक विनोद आणि मिम्ससाही पाऊस पडला.

त्यानंतर हे दोन चिमुकले नक्की कोण आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्यामुळे ‘एका खासगी वृत्तवाहिनीने  बुलडाण्यात जाऊन या दोघांना गाठले. हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील अंबाशीत राहतात. शंकर कोल्हे ( शंकर पाळ्या ) हा त्याचा मावस भाऊ असलेला कार्तिक भुसारी ( कारल्या ) यांच्याकडे गेलेला होता. यातील शंकर अगदी खोडकर मुलगा रोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव तो भांडण करतो. मात्र, हे भांडण भलतेच गमतीशीर ठरले, असे कार्तिकच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

शंकर आणि कार्तिक यांना भांडणाबद्दल विचारले असता त्यांनी आम्ही आता हे भांडण मिटवल्याचे सांगितले. शंकरने खेळता खेळता कार्तिकला ‘कारल्या’ म्हणून त्याला चिडवलं. यावरुन दोघांचे भांडण सुरू झाले. कार्तिकने मग शंकरला शंकरपाळ्या म्हणून चिडवलं. त्यामुळे हा सगळा गमतीशीर वाद रंगला.