सचिन तेंडुलकरला झाले चार वाघांचे दर्शन

January 28,2021

चंद्रपूर : २८ जानेवारी - राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधत ताडोब्यात आलेला प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सहकुटुंब मुक्कामी आहे. व्याघ्रदर्शनाच्या आशेने आलेल्या सचिनला चारही सफारीदरम्यान वाघोबाने दर्शन दिल्याची माहिती प्रकल्पातील सूत्रांनी दिली.

मागील वर्षी सचिन याच सुमारास दोन दिवस ताडोब्यात होता. यंदा अधिक दिवस ताडोब्यात मुक्कामी असल्याचे दिसून येत आहे. त्याने बफरमधील अलीझंझा, मदनापूर, बेलारा या तीन तर कोअरमधील कोलारा गेटमधून जात एकूण चार सफारी केल्या. पत्नी डॉ. अंजली, मुलगा अर्जुन व मुलगी सारासह सचिन सफारीसाठी जात आहे. मागील तीन दिवस त्यांना वाघ, बिबटसह रानगवा, सांबर, चितळाने दर्शन दिले. नवरंगी, सातभाई व स्थलांतरित पक्षीही त्याने पाहिले. आज, गुरुवारी सचिन परत जाणार असल्याची माहिती आहे.