कोणत्याही झटापटीशिवाय बलात्कार करणे पुरुषाकरीत अशक्य - उच्च न्यायालय

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - मुलीचे तोंड दाबून ठेवणे, तिच्यासह स्वतःला निर्वस्त्र करणे आणि कोणत्याही झटापटीशिवाय बलात्कार करणे या गोष्टी एकट्या पुरुषाकरिता अशक्य आहेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठाने एका प्रकरणात नोंदवून संबंधित आरोपीला ठोस पुराव्याअभावी निर्दोष सोडले. 

सुरज कासरकर असे आरोपीचे नाव असून तो यवतमाळचा रहिवासी आहे. २६ जुळ्या २०१३ रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास तक्रारकर्ती मुलगी घरामध्ये खाटेवर झोपली होती तिचा लहान भाऊ खाली झोपला होता र आई घराबाहेर गेली होती. यादरम्यान आरोपी दारूच्या नशेत तिच्या घरात आला. त्याने मुलीने ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले आणि त्यानंतर मुलीसह स्वतःचे कपडे काढून अत्याचार केला अशी तक्रार होती. ही तक्रार नागपूर खंडपीठाने  अविश्वासार्ह ठरवली. या सर्व गोष्टी करणे एकट्या पुरुषाकरिता अशक्य आहेत. हा बलात्कार असता तर मुलगी व आरोपीमध्ये झटपट झाली असती. वैद्यकीय अहवालानुसार मुलीच्या शरीरावर कोणत्याच जखमा नव्हत्या मुलीची शरीरसंबंधास संमती होती. हा आरोपीचा बचाव आहे. तर घटनेच्या वेळी आई आली नसती तर तक्रार नोंदविली नसती असे मुलीने मान्य केले आहे. असे उच्च  न्यायालयाच्या निर्णयात नमूद केले आहे. आरोपीला मुलीच्या बायनावरून दोषी ठरवले जाऊ शकते पण बयान व पुरावे  विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी दिला आहे.