जयंत पाटील - अनिल देशमुखांनी घेतला गडचिरोलीचा आढावा

January 28,2021

गडचिरोली : २८ जानेवारी - महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे अहेरी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम साठी आले होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहेरी येथील प्राणहिता उप.पोलीस मुख्यालयात पोलीस विभागाचा आढावा घेतला.यावेळी पोलीस उप.महानिरीक्षक संदीप पाटील,पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अति.पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सी.आर.पी.एफ.9 बटालियनचे कॉमंडन्ट आर.एस.बाळापुरकर यांची उपस्थिती मध्ये आढावा घेण्यात आला.त्या नंतर 26 जानेवारीला घोषित करण्यात आलेल्या सी.60च्या जवानांना पदक देऊन गौरव करण्यात आला.

त्यानंतर शस्त्रांची जवानांकडून माहिती जाणून घेतली. स्वतः गृहमंत्री देशमुख यांनी रायफल हाताळली.त्यानंतर गृहमंत्र्यांनी अत्याधुनिक सेवा उपलब्ध असलेल्या बॉम्बरोधक वाहनात बसून पाहणी केली माहिती जाणून घेतली. यानंतर पोलीस उप-मुख्यालयाच्या परिसराची पाहणी केली . पोलीस जवानांची आस्थेने विचारपूस केली आणि जवानांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यांनतर गृहमंत्री देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमासाठी रवाना झाले.