स्मार्ट सिटीच्या सायकल ट्रॅक कार्याचा शुभारंभ

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या माध्यमाने १८ किमी मधून ६ किमी लांब डेडीकेटेड सायकल ट्रॅकच्या पहिल्या चरणाचे कार्याचा शुभारंभ नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  राधाकृष्णन बी आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  भुवनेश्वरी एस यांनी मुख्यमंत्री बंगला रामगिरीच्या समोर गुरुवारी (२८ जानेवारी) ला सकाळी पारंपारिक पध्दतिनी केला. पहिल्या चरणामध्ये ६ किमीचा सायकल ट्रॅक तयार होईल.

केन्द्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेले इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रम मध्ये शापूरजी - पॉलनजी कंपनीकडून प्राप्त सी.एस.आर निधितून सायकल ट्रॅकच्या निर्माण होणार आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने १८ किमी लांब सायकल ट्रॅक प्रस्तावित केला आहे. आता प्रथम चरण मध्ये ६ किमीचा ट्रॅकचे काम सुरु केलेले आहे. कोव्हिड-१९ च्या काळात मोठया प्रमाणामध्ये नागरिकांनी सायकलचा वापर केला. सायकल चालविणे आपले शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक आहे तसेच पर्यावरणालापण याचा मोठा फायदा होतो. सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी वेगळयाने जमीन संपादन करण्याची गरज नाही. आता नवीन रस्त्याचे निर्माण करतानाच सायकल चालविणेसाठी सायकल ट्रॅकचा डिजाईन मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

 स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  भुवनेश्वरी एस यांनी सांगितले की, इंडिया सायकल्स फार चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत १८ किमीच्या सायकल ट्रॅकचा निर्माण नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमाने केला जात आहे. सायकल चालविणा-यांसाठी ही फारच मोठी संधी स्मार्ट सिटीच्या वतीने उपलब्ध करुन दिली जात आहे. आमचा प्रयत्न आहे की नागरिकांनी जास्तीत- जास्त सायकलचा वापर करावा त्याच्यातुन ते निरोगी राहतील आणि प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होईल.