उपराजधानीत कोरोनाचा धोका वाढला, २४ तासात ६४४ बाधित रुग्ण

February 18,2021

नागपूर : १८ फेब्रुवारी - नागपूरसह यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात कोरोनाने परत एकदा डोके वर काढले असून तीन जिल्ह्यात कोणत्याही क्षणी संचारबंदी लागण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच २४ तासात नागपुरात ६४४ बाधित रुग्ण आढळले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज परत एकदा कोरोनाने आपला प्रकोप दाखवला असून ६४४ रुग्णांमध्ये ५७४ रुग्ण शहरातील ६७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर ३ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. २५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बाधित रुग्णांचा आकडा १४१०२८ वर पोहोचला आहे. तर कोरोनमुक्त झालेल्यांची संख्या १३१६७० वर पोहोचली आहे. आज ६७७५ चाचण्या झाल्या असून त्यात ३९६६ शहरातील तर २८०९ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या आहेत.