अवैध मोहफुलाच्या दारू अड्ड्यावरून ३ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपी अटकेत

February 23,2021

गोंदिया : २३ फेब्रुवारी - पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस ठाण्यात पोलिस व होमगार्डचे १0 विशेष वेगवेगळे पथक तयार करुन शहरातील संत रविदास वॉर्डातील अवैध मोहफुलांच्या दारू गाळण्याच्या १0 अड्ड्यांवर एकाच वेळी छापा घालण्यात आला. यात एकूण ३ लाख ८६ हजार ८५0 रुपयांचा माल जप्त करून एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज सकाळी ५ ते ८ वाजतादरम्यान करण्यात आली.

या कारवाईमध्ये श्यामराव श्रीराम झाडे हा आपल्या घरी मजूर रोहित बाबुराव बरयिकर, संजय रामा शहारे, कुलदीप अंताराम भोयर यांच्यासोबत दारूची भट्टी लावून दारू काढताना मिळून आला. त्यांच्या जवळून रनींग भट्टी, साहित्य, ३0 लिटर मोहफुलांची दारू, २0 प्लास्टिक पोत्यात सडवा मोहफूल असा एकूण ३८ हजार ७५0 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. शिला विनोद खरोले हिच्या घरातून ९१ प्लास्टिक पोत्यात १८२0 किलो सडवा मोहफुल असा १, ४६, ८५0 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. माया प्रकाश बरियेकर व सुरज प्रकाश बरियेकर यांच्या घरी ५५ प्लास्टिक पोत्यात ११00 किलो सडवा मोहफूल, साहित्य असा एकूण ८९ हजार २५0 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. शकील रहीमखा पठाण याच्या घरी कंपाउंडमध्ये ७0 प्लास्टिक पोत्यात एकूण १४00 किलो सडवा मोहफूल, हातभट्टी साहित्य असा एकूण १ लाख १२ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. असा एकूण ३ लाख ८६ हजार ८५0 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते, पोलिस उपनिरीक्षक केंद्रे, महिला पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे, नाईक पोलिस शिपाई मुकेश थेर, श्रीरामे, बर्वे, पोलीस शिपाई अंबाडे, अंबुले, पंकज सवालाखे, प्रशांत काहलकर, भुमेश्वरी तिरीले यांनी केलेली आहे.