मुलीला पळवून नेणारा आरोपी दिल्लीत सापडला, मुलीलाही ताब्यात घेतले

February 24,2021

अमरावती : २४ फेब्रुवारी - शिक्षणाकरिता वरूड येथे आलेल्या एका मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना वरुड पोलिस स्टेशनअंतर्गत नुकतीच उघडकीस आली असून, या संबंधित मुलीच्या आईवडिलांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलिस स्टेशनला दिली असता वरुड पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून अपहरण झालेल्या मुलीसह आरोपी आसीफ मुसा पठाण, रा.परभणी याला दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.वरूड पोलिस व त्यांच्या सहकार्यानी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

सविस्तर असे की, वरूड येथे एक मुलगी शिक्षण घेण्याकरिता आपल्या कुटूंबीयाकडून ट्यूशन फीचे ६२ हजार रुपये घेऊन आली होती. ७ फेब्रुवारी २0२१ पासून सदर मुलीचा मोबाईल बंद असल्यामुळे त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर आसीफ नावाचा तरुण तिला सतत फोन करीत होता व त्यानेच तिला फुस लावुन पळवुन देण्याची तक्रार वरूड पोलिस स्टेशन येथे दाखल केली. वरूड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घ्ेाता पोलिस निरिक्षक प्रदिप चौगावकर यांनी या संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना या संबंधीत माहिती देऊन कारवाईला सुरूवात केली. पोलिस सहकार्यांनी वेगवेळया टिम तयार करून सायबर सेलच्या मदतीने वेगवेगळया ठिकाणी शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या सखोल तपासानंतर अखेर अपह्त मुलीला दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले तर आरोपी आसीफ मुसा पठाण वय २१ रा. बिहारी कॉलनी,मानवत, जि.परभणी याला अटक करण्यात आली. पो.नि.प्रदिप चौगावकर यांचे मार्गदर्शनात पो.उ.निरीक्षक कृष्णा साळूंके करीत असून अपह्त मुलीला तिच्या आई वडीलांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. तर या प्रकरणाची योग्य पध्दतीने छळा लावुन अपह्त मुलीला आरोपिच्या तावडीतुन सुखरूप परत आणल्यामुळे वरूड पोलिस व त्यांच्या सहकार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक हेात आहे.