चंद्रपूरला दारू नेत असताना पोलिसांनी टाकली धाड, सव्वादहा लाख रुपयाचा माल जप्त

February 24,2021

यवतमाळ : २४ फेब्रुवारी - मारेगाव शहरातील ए.वाय. जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानातून चंद्रपूरकडे ३ अलिशान गाडीत देशी दारू भरून जाण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलिस पथक तथा मारेगाव पोलिस पथकाला गुप्त माहिती मिळताच धाड टाकण्यात आली असुन या धाडीत सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री सुरू असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून अवैध दारुचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा होत असताना मारेगाव शहरातील हाय वे वरिल अक्षरा बियर बारच्या मागे असलेल्या देशी दारू दुकानातुन समोर उभ्या असलेल्या २ चारचाकी वाहन क्र एम एच 0२, बी जी ४६४३, एम एच ३१, ई ए .४३३८ व एक डिस्कव्हर टू व्हिलर एम एच २९, यू ७0९५ क्रमांकाच्या वाहनामध्ये ३लाख रुपयाची रॉकेट व डेक्कन कंपणीची देशी दारू भरण्यात आली होती. याबाबतची गुप्त माहीती मारेगाव पोलिसासह उपविभागीय पोलीस पथकाला प्राप्त होताच घटनास्थळी धाड टाकली असता प्रमोद ठेंगणे वय ३३ व अतुल वर्हाटे वय २५ यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सध्या मारेगाव शहरात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना येथील देशी दारू दुकानातुन चंद्रपूर जिल्हात देशी दारु पोहोचविण्याचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांची नजर चुकवून हा अवैध दारूचा पुरवठा करण्याच्या प्रयत्न सुरू असताना उपविभाग पोलिस पथकाला दारू तस्करी होत असल्याची टिप खबरीकडून प्राप्त झाली होती. या गोपणीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात येवुन मंगळवारच्या पहाटे ३ चार चाकी वाहनातील देशी दारुचे बॉक्स तथा वाहने असा एकुण १0 लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, आरोपी देशी दारू दुकानाच्या वॉल कंपाऊड वरून उडी मारून पसार होण्यात यशस्वी झाले असुन एक लाल चारचाकी वाहनही पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाली, घटनास्थळी प्रमोद ठेंगणे व अतुल वर्हाटे याना घटनास्थळी अटक करण्यात आली असुन त्यांचेवर, मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ ( अ ) ( ई ) ८२, ८३ नुसार कारवाई करण्यात आली आहे.