अन्यथा यवतमाळ जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून १० दिवसांचा लॉकडाऊन - पालकमंत्री संजय राठोड

February 24,2021

यवतमाळ : २४ फेब्रुवारी - यवतमाळ जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांकडून कोव्हिड संदर्भातील सुचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे आणि चाचण्यांसाठी समोर आयला हवे. अन्यथा प्रशासनाला ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच येत्या दोन-तीन दिवसात या परिस्थितीवर गांभिर्याने लक्ष ठेवले जाईल. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून किमान 10 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यवतमाळ, पुसद, दिग्रस दारव्हा, पांढरकवडा तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभिर्याने शोध घेण्याचे आदेश दिले.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 20 जणांची नमुने काढानमुने तपासणी आणि चाचण्या यांचे रोजचे उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे. रुग्णाच्या संपर्कातील कोणीही सुटता कामा नये. एका पॉझिटिव्ह व्यक्तिमागे किमान 20 जणांची नमुने घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये मुंबईनंतर यवतमाळ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खासगी रुग्णालयातील मृत्यूबाबत तीन सदस्यीय समितीचे गठण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. 1138 पॉझेटिव्ह रुग्ण अॅक्टिव्हसद्यस्थितीत जिल्ह्यात 1138 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16501 झाली आहे. जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14913 आहे. तर जिल्ह्यात एकूण 450 मृत्युची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 155044 नमुने पाठविले असून यापैकी 154308 प्राप्त तर 736 अप्राप्त आहेत.