अमरावतीत संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे सुरु

February 25,2021

अमरावती : २५ फेब्रुवारी - संचारबंदीत देण्यात आलेल्या सवलतीचा फायदा घेऊन विनाकाम शहरात फिरणार्यांच्या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी पोलिस अधिकार्यांना दिले आहे.अमरावती शहरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिस प्रशासनाकडुन नाकाबंदी व फिक्सपॉईट लावण्यात आले आहे. तसेच गस्तही सुरू आहे. विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे.  पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्वत: नाकाबंदी व फिक्स पॉईंटला भेट देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. भेटी दरम्यान आढळलेल्या वाहन चालकांची कडकपणे त्यांनी चौकशी केली.

 सध्याच्या टाळेबंदीत कोर्ट, एमआयडीसी, सर्व शासकीय कार्यालये, रेल्वे, बसेस सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. हॉटेलमधून पार्सल सुविधाही सुरू आहे. उपरोक्त सवलतीचा आधार घेऊन काही नागरिक विनाकाम बाहेर पडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सवलतीचा गैरफायदा नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. अशा सर्व लोकांवार गुरूवापाासून कडक कारवाई करण्यात येईल. त्यांच्या गाडया जप्त करण्यात येईल. तसेच दंड वसुल करण्यात येईल. विविध कलमान्वये गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. आरती सिंग यांनी केले आहे.