जंगलात गेलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला करून केले ठार

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - सरपणासाठी जंगलात गेलेल्या शेत मजुरावर वाघाने हल्ला करुन त्यास ठार केले. ही घटना भद्रावती पोलिस ठाण्यांर्गत गुळगाव-वडेगाव जंगल शिवारात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मोरेश्वर शामराव श्रीरामे (35, रा. चिचोली-चोरा) असे मृतकाचे नाव आहे. जाळ दुपारी 2 वाजताच्या सुमारास स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी नजिकच्या गुळगाव-वडेगाव जंगलात तो गेला होता. तेथे बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. रात्र होऊनही मोरेश्वर घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता, सकाळी 10 वाजता शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. वनाधिकारी व पोलिसांनी पंचनामा केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.