वाघाने केली बैलाची शिकार

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथे काल रात्री पट्टेदार वाघाने गावाबाहेर दामोदर केशव ढोणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलांवर हल्ला करून एक बैलाची शिकार केली. यांतर १00 मिटर दूर ओढत  नेले.

वडसी हे जंगल व्याप्त भागाला लागून असलेले गाव असून या गावात नेहमीच वाघा ची वर्दळ असून दहशत आहे. काल मंगळवारी रात्रीपासून पट्टेदार वाघ हा गावाच्या आडोश्याला दबा धरून बसला होता. दामोदर ढोणे यांचा बैलाचा गोठी हा गावाला लागून बाहेर आहे. ढोणे यांनी बैल बांधले आणि घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाव शांत झाल्यावर वाघाने गोठय़ावर आक्रमण करीत बैलावर हल्ला केला आणि त्याला जागेवर ठार करीत १00 मिटर दूर ओढत नेले. सकाळी बैल मालक ढोणे बैलांना बाहेर काढण्यासाठी आले असता बैल जागेवर दिसला नाही झटपट झाल्याची चिन्हे दिसल्यावर व रक्त पडल्याचे दिसल्यावर त्यांना बैलाची शिकार झाल्याचे समजले. तेव्हा त्यांनी शोध घेतला असता शंभर मिटर वर बैल मृतावस्थेत दिसला. सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनरक्षक सोनुने व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. ढोणे यांचे फार मोठे नुकसान झाले असून अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे बैल ठार झाले. वनविभागाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली.