शेतशिवारात बिबट्या मृतावस्थेत सापडला

February 25,2021

यवतमाळ : २५ फेब्रुवारी - आर्णी तालुक्यातील माळेगाव येथील शेतशिवारात बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. दक्षिण वनपरिक्षेत्र सावळी सदोबामधील माळेगाव शेत शिवारामध्ये विठाबाई चौधरी यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

शेतमालक दुपारच्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसला.

त्याच क्षणी त्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी ही बाब पशुवैद्यकीय विभागाला कळविली. वन विभाग व पशुवैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. लगेच उपवनसंरक्षक विपुल राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.