रिझर्व्ह बँक स्वतःचेच डिजिटल चलन निर्माण करणार - गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जगभरात प्रचलित असलेल्या विविध डिजिटल चलन आणि खाजगी क्रिप्टोचलनांबाबत चिंता व्यक्त केली असून, आरबीआय स्वतःचे डिजिटल चलन निर्माण करणार असल्याची माहिती दिली. खाजगी कि‘प्टो चलन जोखीम असल्याचे त्यांनी सांगितले.खाजगी कि‘प्टो चलनाच्या व्यापारास अलिकडे आम्ही मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. आम्ही स्वतःचे अधिकृत डिजिटल चलन निर्माण करणार असून, ही योजना सध्या प्रगतिपथावर आहे. आम्हाला आर्थिक स्थैर्य अधिक महत्त्वाचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

याबाबत अधिकृत तारीख आताच जाहीर करणे शक्य नाही. यामागे अनेक अडचणी असून त्यावर आम्ही काम करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. दास यांच्या वक्तव्यानंतर बिटकॉईनची किंमत 1.5 टक्क्यांनी घसरून 49 हजार 622 डॉलर्सवर आली आहे. संसदेच्या अधिवेशनात बिटकॉईनसार‘या खाजगी चलनांवर बंदी घालण्यासाठी कायदा लागू करण्याबाबत चर्चा होणार आहे. या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. चलनांसंबंधीच्या सरकारी समितीने 2019 साली सर्व खाजगी कि‘प्टोचलनांच्या व्यवहारावर बंदी लादली असून, 10 वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद केली आहे. 2018 साली रिझर्व्ह बँकेने खाजगी चलनांच्या व्यवहारावर असहमती दर्शविली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली.