व्यापारी संघटनांची उद्या भारत बंदची हाक

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - देशभरातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा 26 फेब्रुवारीला ‘भारत बंद’मुळे बंद राहतील, अशी घोषणा किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटीने केली आहे. वस्तू आणि सेवा कराच्या तरतुदींमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांचा आढावा घेण्याची मागणी करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने  26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली. 

जीएसटीच्या अलीकडील तरतुदींविरोधात देशभरात 1,500 ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचे कॅटने म्हटलेय. संघटनेने जीएसटी प्रणालीचा आढावा घ्यावा आणि करांचे स्लॅब अधिक सुलभ करावेत. तसेच व्यापा-यांना नियमांचे पालन करणे अधिक तर्कसंगत केले पाहिजे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, संघटनाही सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करीत आहेत.

अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन देखील कॅटच्या भारत बंद आणि चक्का जामच्या आवाहनास पाठिंबा देणार आहे. “देशातील सर्व व्यापारी बाजारपेठा बंद राहतील आणि सर्व राज्यांच्या विविध शहरांमध्ये धरणे देण्यात येतील.”देशभरातील 40,000 हून अधिक व्यापारी संघटना या बंदला पाठिंबा देतील.