चंद्रपुरातील बांबू रिसर्च सेंटरला अचानक लागली आग

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या चंद्रपूर-मुल मार्गावरील चीचपल्ली येथील बांबू रिसर्च सेंटरला आज दुपारी अचानक आग लागली.

या आगीत बांबू सेंटरची बांबूपासून तयार इमारत पूर्णतः जळून राख झाली. यात कुठलीही मनुष्य हानी झाली नसली तरी करोडो रुपये खर्च करून केवळ बांबूचा उपयोग करून उभारलेली हि इमारत जळून राख झाली आहे.