रेती तस्करांनी केला सरपंचावर प्राणघातक हल्ला

February 28,2021

चंद्रपूर : २८ फेब्रुवारी - चिमूर तालुक्यातील कवडशी (डाक) येथील भाजपचे युवा कार्यकर्ते व नव्याने नुकतेच झालेले सरपंच शुभम राजु ठाकरे यांच्यावर दोन रेती तस्करांनी प्राण घातक हल्ला केला परंतु लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने पायावर मारल्याने शुभम ठाकरेचा पायाचे हाड फ्रॅर झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार आणून भिसी पोलिस स्टेशनला जखमीच्या आई ज्योती ठाकरे यांनी तक्रार केली. त्या दोन आरोपींना अटक केली असून घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी कवडशी डाक येथे जाऊन भेट घेतली तर आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी सुद्धा भ्रमनध्वनीवरून माहिती घेतली. 

सविस्तर असे की कवडशी (डाक) येथील शत्रूघन ठाकरे यांच्या शेताजवळ असलेल्या नदी घाटावर दि २६ फेब्रुवारी च्या रात्री ९ वाजता दरम्यान सरपंच शुभम ठाकरे गेले असता तेथे एक ट्रॅक्टर व अवैध रेती वाहतूकदार डोमा येथील अन्सार कादर शेख वय २५ वर्ष व एजाज कादर शेख वय ३0 वर्ष दिसले. तेव्हा त्या दोन रेती वाहतूकदारांनी सरपंच शुभम ठाकरेला विचारले की तू आमची रेती पकडायला आलास का? त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडा ने मारावयास सुरवात केली. या मारहाणीत शुभम ठाकरेंच्या पायाचे हाड मोडल्याने फ्रॅर झाले आहेत अशी तक्रार जखमींची आई ज्योती राजू ठाकरे यांनी दिली. फिर्यादीच्या तक्रारी वरून शंकरपुर चौकी पोलिसानी दोन्ही आरोपीवर भांदवी नुसार ३२६, ५0६ (३४) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते ,भाजप प्रदेश सदस्य डॉ. श्यामजी हटवादे ,भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष माया नन्नावरे सह सरपंच प्रफुल कोलते, सरपंच अरविंद राऊत भाजपचे चिमूर शहर महामंत्री सूरज नरुले, माजी नगरसेविका भारती गोडे व त्यांच्या सहकार्यांनी यांनी जखमी सरपंच यांच्या घरी जाऊन भेट घेत सांत्वन करीत दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले.