१३ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू

February 28,2021

गडचिरोली : २८ फेब्रुवारी - नातेवाईकासोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. राजशेखर राजन्ना सल्ला (१३) रा. कोटापोचमपल्ली असे मृत्यूक बालकाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या नगरम येथे बोनालू कार्यक्रम असल्याने तो आपल्या नातेवाईकाच्या घरी आला होता. आज सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास आपल्या नातेवाईकासोबत प्राणहिता नदीघाटावर राजशेखर सल्ला आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करीत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली असता दुपारी १ वाजताच्या दरम्यान राजशेखरचा मृतदेह आढळून आला. त्याला तत्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी राजशेखरला मृत घोघित केली. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे.