रानडुकराने केला शेतमजुरावर हल्ला, शेतमजूर गंभीर जखमी

February 28,2021

यवतमाळ : २८ फेब्रुवारी - रानडुकराने शेतकर्यावर प्राणघातक हल्ला केल्याने पाटणबोरी परिसरातील शेतकरी शेतमजुर वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ही घटना काल शुक्रवारी रात्री झरीजामणी तालुक्यातील पिवरडोल येथे घडली. येथील शेतकरी बालाजी गुरनुले (३२) हा नेहमीप्रमाणे रात्री नऊच्या सुमारास शेतात गेला होता. दरम्यान शेतामध्ये अचानक त्याच्यावर रानडुक्कराने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत पाटणबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. आरएफओ मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पंचनामा करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.जखमी शेतकर्याला वनविभागाच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.