जगातील १३९ देशांच्या चलनी नोटा, नाणी आणि पोस्टाची तिकिटे यांचा दुर्मिळ संग्रह जमवला

February 28,2021

यवतमाळ : २८ फेब्रुवारी - पुसद येथील एका महाविद्यालयीन तरुणाने जगातील 139 देशांच्या विविध प्रकारच्या नोटा, नाणी आणि पोस्टाची तिकीटे जमा करून एक दुर्मिळ संग्रह  तयार केला आहे. या संग‘हात चंद्रगुप्त मौर्य, शिवकालीन तसेच ब्रिटिश कालातील ज्यावर भारतीय देवीदेवतांच्या छबी असलेल्या, तसेच आकाराने सर्वात लहान नाण्यांचा समावेश आहे. 

येथील स्वामी विवेकानंद कॉलनीत राहणार्या साईसंकेत गजानन आरगुलवार याला लहानपणापासूनच विविध प्रकारची नाणी व नोटा यांचा संग्रह  करण्याचा छंद आहे. त्याचे बीबीएचे शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण चालू असतानाही संग्रहाचा छंद त्याने जोपासला आहे. त्याने पन्नास देशांसह व भारतीय अशा 600 पेक्षा जास्त नाण्यांचा, जगातील 139 देशांच्या 400 पेक्षा जास्त नोटांचा तर 150 देशांची 200 पेक्षा जास्त पोस्टाच्या तिकीटांचा दुर्मिळ संग्रह  तयार केला आहे. 

या संग्रहात ब्रिटिशकालीन 30 ते 35 नाणी ज्यामध्ये विशेष करून भारतीय देवीदेवतांची छबी असलेली नाणी, चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील चांदीची पाच नाणी तर 400 वर्षे जुन्या शिवाजी महाराजांचे ‘छत्रपती’ हे नाव मुद्रित केलेल्या पाच ‘शिवराया’ त्याच्याकडे असून शंभर शिवराया प्रमाणित करण्यासाठी पाठविल्या असल्याचे त्याने सांगितले. 

साईसंकेत आरगुलवारला लहानपणापासूनच विविध रंगाच्या आकर्षक नोटा जमा करण्याची आवड होती. वडील व आजोबा इलेक्ट्रीकलचे दुकान चालवीत असून त्याच्या या छंदाला कुटुंबातील आजीआजोबा, आईवडील यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. 

साईसंकेतकडे एक पासून दोन हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या भारतीय नोटा असून फॅन्सी नोट, बर्थडे नोट, एकच नंबर असलेल्या नोटा, स्टार असलेल्या नोटा, सुरवातीला शून्य व अखेरीस शून्य नंबर असलेल्या नोटा, चार अंक समान असलेल्या नोटा, सदोष छपाई, कटिंग एररच्या, नंबरच्या आधी स्टार म्हणजेच रिप्लेसमेंटच्या नोटा आहेत. 

वेगवेगळ्या गव्हर्नरची स्वाक्षरी असलेल्या, तसेच थायलंडच्या राजाचे स्पेशल व्हाऊचर अनकट सीट, आकाराने सर्वात मोठी जिचा आकार बारा गुणिले सव्वीस सेंटीमीटर असलेली रशियातील शंभर रुबेलची नोट, तर आकाराने सर्वात लहान असलेली हाँगकाँगमधील युनिफेस (एकाच बाजूने छापलेली) वन सेन्ट ही चार गुणिला नऊ सेमी आकाराची नोट आहे. 

त्याच्याकडे अंटार्क्टिका, आर्टिक व बि‘टिश सैन्यदलाचे तीन स्पेशल व्हाऊचर्स आहेत. बी आफ‘ा या देशाचा विलय नायजेरियात झाल्याने या देशाची बंद झालेली नोट आहे. तसेच हाँगकाँगमधील तीन बँकांनी तयार केलेल्या नोटा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, सॉलोमन आयर्लंड, इंग्लंड, न्युझीलंड, कॅनडा, मालदीव, व्हिएतनाम, इंडोनेशिया, आणि अन्य अशा 139 देशांच्या नोटा आहेत. 

महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या शिवरायांच्या दहा गडकिल्ल्यांची त्याने भ‘मंती करून तेथील पवित्र माती गोळा केली आहे. त्याला गडकिल्ल्यांवर शिवकालीन तांब्याची ‘शिवराया’सुद्धा सापडली आहे. तर काही शिवराया त्याने छत्रपतींच्या वंशजांकडून, तर काही त्याने बोली बोलून घेतले आहेत. त्याच्याकडे जगातील सर्वात कमी किमंतीची व्हिएतनामची ‘डोंग’, तर सर्वात जास्त किंमत असणारी कुवैतमधील ‘दिनार’ आहे. इंग्लंडच्या स्पेशल वन पौंडावर असणारे युके शिल्ड व या शिल्पाची प्रतिकृती होण्यासाठी लागणारी सहा नाणी त्याच्याकडे आहेत. 

विशेष म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील एक बाजू ठसा असलेली ‘मशका’ ही पाच चांदीची नाणी साईसंकेतजवळ आहेत. त्याच्याकडे आकाराने सर्वांत लहान नाणीसुद्धा आहेत. त्याला नाणी व नोटांचे विशेष ज्ञान असून तो शिवकालीन तांब्यांची नाणी असलेल्या शिवरायांची विशेषता सांगतो. तसेच भारतीय नाणी कोलकाता, हैदराबाद, मुंबई किंवा नोएडा यापैकी कुठल्या टाकसाळीत बनली हे नाणी पाहून तो ओळखतो. 

त्याच्याकडे 200 पोस्टाची तिकीटे असून एकाच कागदावर खूपसारी पोस्टाची तिकीटे असणारी पंधरा सुक्ष्मपत्रे, पहिल्या दिवशी प्रकाशित होणारा लिफाफा व त्यावर तिकीट लावून डाकघराणे लाँच केलेल्या प्रथम दिवस दहा आवरणेही असून त्यातील चार छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, हे विशेष. 

साईसंकेतचे इन्स्टाग‘ामवर खाते असून त्याच्या माध्यमातून तो विविध नोटांचे, नाणींचे फोटो व त्याची माहिती प्रसारित करतो. त्याचे अमेरिका, इंग्लंड, थायलंड, पाकिस्तान, तुर्कस्थान, इजिप्त, युगोस्लाविया, दक्षिण आफि‘का, ब‘ाझील, इटली व अन्य देशातील दोन हजारांपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत.

 साईसंकेत आरगुलवारला मराठी, हिंदी, इंग‘जी, उर्दू, संस्कृत व जर्मन अशा सहा भाषा अवगत असून तो अंतर्देशीय कि‘केट संघातदेखील खेळला आहे. त्याला रक्तदान करणे, तबला वाजवण्याचीही आवड असून तो नाणी व नोटांवरील भारतीय पुस्तकांचा अभ्यास करीत आहे.