अकोल्यात विदेशी बनावटीचे देशी पिस्तूल पकडले, एका आरोपीला अटक

February 28,2021

अकोला : २८ फेब्रुवारी - विदेशी बनावटीचे देशी पिस्तुल आज उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्या पथकाने जप्त केले. या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी शाकिर खान अहमद खान यास अटक केली आहे. त्याने हे पिस्तुल कुठून आणले व ते आणण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास पोलिस करीत आहेत. 

दरम्यान, विदेशी बनावटीचे हे देशी पिस्तुल त्याला कुणी दिले व कुठल्या कारणासाठी त्याने आणले याचा शोध पोलिस घेत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा आरोपी सापडला. त्याच्या कडून पोलिसांना एक राऊंड गोळ्या पण मिळाल्या आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षक तुषार नेवारे, जितेंद्र हरणे, महेंद्र बहादूरकर, नदीम शेक, राज चंदेल, रवि दिघे, विनय जाधव,संजय टाले, निखिल माळी यांनी सहभाग घेतला.