विवाह सोहळ्यात भेट आलेली राशी राममंदिर निर्माणासाठी समर्पित

February 28,2021

वाशीम : २८ फेब्रुवारी - मंगरुळनाथ येथील खोडे परिवाराच्या वतीने आयोजित विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थिताकडुन आलेल्या भेट 21 हजार रुपयाची राशी अयोध्या येथील श्रीराम मंदीर निर्माण कार्याकरिता समर्पीत करण्यात आली. मंगरुळनाथ येथील माजी नगराध्यक्ष रामचरण खोडे यांची नात व गणेश खोडे यांची सुकन्या काजल हीचा विवाह राकेश याचे सोबत झाला. नेहमीच प्रत्येक कार्यात समाजहिताच्या किंवा जंनतेच्या कामासाठी अग्रेसर असणार्या खोडे परिवारातील मुलीच्या लग्न समारंभात वधु-वरांसाठी आलेला एकुण 21 हजार रुपये भेट राशी अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठी समर्पित करण्यात आला. त्याच प्रमाणे आलेला सर्व खाऊ मंदिर निर्माण कार्यासाठी दिला या स्तुत्य उपक्रमाचे मंगरूळनाथ शहरात जनते कडून कौतुक होत आहे . 

भाजपा शहराध्यक्ष शाम खोडे व गणेश खोडे यांनी काजल व राकेश यांच्या लग्न समारंभात भेट आलेली राशी वधु वरांच्या हस्ते श्रीराम मंदिर निधी संकलन कर्त्यांच्या हाती समर्पित करुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. या कार्याबाबत वधुवरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खोडे तथा सारवान परिवाराकडून आदर्श घेण्याची काळाची गरज आहे, अशा प्रतिक्रया ऐकावयाला मिळत आहे.