आई आणि मुलीचा दुसऱ्या पतीने केला विनयभंग

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - महिलेच्या दुसऱ्या  पतीने, त्याच्या मुलाने आणि मुलांच्या मित्राने महिलेच्या घरी जाऊन बळजबरी सामान उचलून नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने आणि तिच्या मुलीने अडविले असता, आरोपींनी आई आणि मुलीला हातबुक्कीने मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रार करणार्या महिलेची दोन लग्न झाले आहेत. तर त्या महिलेच्या दुसर्या पतीचीही दोन लग्ने झाली आहेत. महिला पहिल्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिचे दुसरे लग्न गोपाल सत्यनारायण अग्रवाल (५0) याच्याशी झाले. गोपाल याच्या पहिल्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यांनी फिर्यादी महिलेशी रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यावेळी महिलेने तिला मुले असल्याचे लपविले होते. काही दिवासांनंतर महिला १७ वर्षाच्या मुलीला घरी घेऊन आली. अचानक महिलेने मुलगी असल्याचे सांगितल्यामुळे गोपाल आणि महिलेमध्ये भाडण सुरू झाले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. दोघेही पती पत्नी त्यांच्या त्यांच्या मुलांसह राहू लागले.१७ डिसेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोपाल अग्रवाल , त्याचा मुलगा भावेश अग्रवाल ,त्याचे मित्र घनश्याम , दीपक आणि किसन हे चौघे फिर्यादी महिलेच्या घरी आले. घरातील ड्रेसिंग टेबल आणि कपाट घेऊन जाऊ लागले. त्यावेळी महिलेने त्यांना अडविले. सर्व आरोपींनी महिलेशी भांडण करणे सुरू केले. त्यावेळी महिलेची अल्पवयीन मुलगी मध्ये पडली. सर्व आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.