नागपुरात २४ तासात ८९९ बाधित रुग्ण

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - गेल्या ५ दिवसांपासून नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरु असतानाच ११००च्या वर गेलेला कोरोना बाधितांची संख्या आज ८९९ वर पोहोचली आहे. तर  २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शनिवार रविवार नागपुरात संचारबंदी असल्यामुळे व बाजारपेठ पूर्णतः बंद असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी आली आहे. असे चित्र आहे. २४ तासात ८९९ बाधित रुग्ण आढळले असून त्यात शहरातील ७२२ तर ग्रामीण भागातील १७४ व इतर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २ रुग्ण शहरातील व ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. २४ तासात नागपुरात ११५४२ चाचण्या झाल्या असून ७६१९ शहरातील आणि ३९२३ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या आहेत.  नागपुरात सध्या ८२५३ रुग्णावर उपचार सुरु असून त्यात ६९०१ शहरातील आहेत तर १३५२ ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.