नागपुरात 130 मैदाने तयार : गडकरी

February 28,2021

नागपूर : २८ फेब्रुवारी - नागपूर महानगरातील विविध भागांमध्ये एकूण 130 मैदाने खेळण्यासाठी सज्ज करण्याचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून  मी लवकरच या सर्व क्रीडांगणाच्या तयारीची पाहणी करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री व खासदार क्रीडा महोत्सवाचे मार्गदर्शक नितीन  गडकरी यांनी केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त पत्रकार संजय लोखंडे संपादित "खेल खिलाडी खेल" या नवीन अर्धवार्षिकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करताना प्रमुख अतिथी म्हणून नामदार नितीन गडकरी बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, विनोद देशमुख, आनंदकुमार  निर्बाण, विश्वजीत भगत, निशांत गांधी,  श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त त्रिलोकीनाथ सिद्रा, नोएल जोसेफ,  संजय वाटवे, त्रिलोचन खरबडे,  क्रीडा भारतीचे प्रसन्न हरदास यावेळी आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी नितीन गडकरींना सामाजिक जीवनाचे प्रचंड भान असल्याचे जाणवले. सायंकाळनंतर तरुण पिढीला सुदृढ आरोग्यासाठी लाभदायक उपक्रम नसल्याने नको त्या वाममार्गाकडे  युवक वळतात अशी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून सायंकाळनंतर पूर्वी खेळले जाणारे कबड्डी, खो-खो, कुस्तीसह अन्य खेळ खेळल्या जाणाऱ्या  क्रीडांगणावर  विद्युतप्रकाशासह सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहणार आहे.