संपत्तीच्या वादातून काकानेच जाळली पुतण्याची जिंनिंग फॅक्टरी

March 01,2021

वर्धा : १ मार्च - संपत्तीच्या वादातून काकानेच पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळल्याचा  धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबतच पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न काकाने केला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ही घटना घडलीय. या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काका दीपक देशमुख याला पोलिसांनी अटक केली.या घटनेत जिनिंगमधील 45 ते 50 लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर आर्वी नगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठत आग विझवली. 

दाखल केलेल्या तक्रारीनुसार आर्वी येथील कौस्तुभ देशमुख यांच्या मालकीची एक जिनिंग आहे. ते त्यांच्या जिनिंमध्ये काम करत होते. यावेळी आरोपी दीपक देशमुख म्हणजेच कौस्तुभ देशमुख यांचे काका तलवार घेऊन आले. यावेळी त्यांनी कौस्तुभला धमकावलं. तसेच, त्यांनी पेट्रोल टाकून जिनिंगमध्ये आग लावली.  आग वाढल्यामुळे कोस्तुभ आपला जीव वाचवत पोलीस ठाण्यात गेले. तिथे गेल्यांनतर त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रसांगाची माहिती दिली.

काकाला अटक

कौस्तुभ देशमुख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. पोलिसांनी कौस्तुभचे काका म्हणजेच आरोपी दीपक देशमुख आणि त्यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. तक्रार दाखल केल्यानुसार दीपक देशमुख यांनी लावलेल्या आगीत तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.