भरधाव बोलेरोने ७ वर्षीय बालकाला उडवले

March 01,2021

वाशीम : १ मार्च - भरधाव वेगाने एका बोलेरो ने सात वर्षीय बालकास उडविल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास रिसोड मोहजा इंगोले रोडवर भोकर खेडा येथे घडली असून यात अपघातास कारणीभूत असलेली बोलेरो गाडी फरार झाली. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील सिद्धेश्वर विष्णू रंजवे (वय 7) हा रिसोड मोहजा रोडवर असलेल्या आपले गावी भोकरखेडा येथील गजानन महाराज मंदिरा समोरील रस्त्याच्या कडेला खेळत होता. दरम्यान रिसोड कडून मोहजा इंगोलेकडे भरगाव वेगाने जात असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एमएच 04 इ टी 63 38 याने सिद्धेश्वर ला जोरदार धडक दिली. या धडकेत सिद्धेश्वर चा घटनास्थळीच मृत्यू झाला तर बोलेरो चालकाने आपली गाडी घेऊन तेथून पसार केला. गावातील काही लोकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही हाती लागला नाही. रुस्तमा पंडित रंजवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 304 अ 279 नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बिट अधिकारी गायकवाड हे करीत आहे.