संचारबंदीच्या दरम्यान अवैध दारू विकणाऱ्यांना अटक

March 01,2021

यवतमाळ : १ मार्च - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून तर सोमवारी सकाळ पयर्ंत संपूर्ण संचारबंदी लागू केली होती संचार बंदी मुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद असल्यामुळे शहरातील छोटी गुजरी व पिंपळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना माहिती मिळाली होती त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात  धाडी टाकल्या असता कमलेश गणेशलाल पातालवंशी राहणार छोटी गुजरी शैलेश महादेव पातलवंशी राहणार छोटी गुजरी नरेंद्र राजेंद्र जयस्वाल राहणार पिंपळगाव यवतमाळ यांचेकडे धाड टाकून झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून ५१ हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.  त्यामध्ये स्टलिर्ंग रिझर्व १८0 मिलीच्या ९ बॉटल किंमत १५३0 रुपये ओसी ब्लू १८0 मिली ३३ बॉटल किंमत ४६२0 रुपये ब्लेंडर्स प्राइड १८0 मिली १0 बॉटल किंमत ३२00 रॉयल स्टेग १८0 मिली १७0 बॉटल किंमत २0४0 रु ब्लॅक डॉग ७५0 मिली ची एक बॉटल किंमत २४00 रुपये ऑफिसर्स चॉईस ब्लू ९0 मिली च्या १२३ बॉटल किंमत ९२२५ रुपये ट्यूबर्ग टिनपॅक ५00 एमएल ४३ बॉटल किंमत ५५९0 रुपये ट्यूबर्ग ६५0 ईमेल ७0 बॉटल किंमत ११९00 रुपये इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या १८0 एमएलच्या १0 बॉटल किंमत १४00 रु किंगफिशर कंपनी च्या प्रत्येकी ५00 एमएलच्या ७ बॉटल किंमत १0५0 रुपये ट्यूब बर्ग टिन प्रत्येकी ६५0 मिली २२ बॉटल किंमत २८६0 रुपये किंग फिशर स्ट्रॉंग कंपनीच्या प्रत्येकी ५00 मिली ५ बॉटल किंमत ६७५ रुपये डेक्कन अमर संत्रा देशी दारू च्या १८0 एमएलच्या ४८ बॉटल किंमत २४00 रुपये डेक्कन अमर संत्रा देशी दारू च्या ९0 मिली च्या १00 बॉटल किंमत २ हजार चारशे रुपये असा  मुद्देमाल या कारवाईदरम्यान वरील व्यक्तीकडून जप्त करण्यात आला वरील तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.