नागपुरात भाजप नेत्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

March 01,2021

नागपूर : १ मार्च - पूजा चव्हाण आत्महत्या  प्रकरणावरून भाजप आणि शिवसेनेत  वाद पेटला आहे. तर दुसरीकडे  नागपूरमध्ये भाजपचे नेते आणि कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर एका महिलेल्या धमकावल्या प्रकरणी विनयभंग आणि  अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जमीन भूखंडाच्या वादात पीडित महिलेला धमकावणे व अश्लील शिवीगाळ करणे असा आरोप मुन्ना यादव यांच्यावर आहे. या प्रकरणी  मुन्ना यादव यांच्यावर नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुन्ना यादव हे भाजपच्या कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आहे.

प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 40 वर्षीय महिला राहते. या महिलेनं प्रमोद डोंगरे नावाच्या व्यक्तीसोबत जयताला इथल्या पांडुरंग नगर इथे 12 लाखांचा जमिनीचा व्यवहार केला होता.  आरोपी प्रमोद डोंगरेने या महिलेला 6 लाख रुपये दिले होते. ही जागा सीनू होरो नावाच्या व्यक्ती होती, तो झारखंड येथील रहिवासी आहे. सीनू होरो याने प्रमोद डोंगरे याला आपले घर विकण्याचा अधिकार दिला होता. पण प्रमोदने पीडिते महिलेला कुठेही व्यवहारात उल्लेख केला नाही. त्याने हे घर राजवीर यादव नावाच्या तरुणाला विकले. राजवीर यादव हा मुन्ना यादवचा निकटवर्तीय  आहे. त्यामुळे मुन्ना यादव याने पीडिते महिला आपल्या संपर्क कार्यालयात वाद सोडवण्यासाठी बोलावले होते. पण यावेळी वाद पेटला. मुन्ना यादव यांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडित महिलेनं केला.

अखेर या प्रकरणी आता नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.