ज्येष्ठांऐवजी तरुणांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या - मल्लिकार्जुन खर्गे

March 01,2021

नवी दिल्ली : १ मार्च - देशातील ज्येष्ठ व्यक्तींऐवजी तरुणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी  प्राधान्य दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केले. माझे वय आता 70 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तरुणांना कोरोनाची लस आधी दिली पाहिजे. माझ्या तुलनेत त्यांना आयुष्यातील आणखी बरीच वर्षे काढायची आहेत. मी फारतर आणखी 10-15 वर्षे जगेन, असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले. 

भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मल्लिकार्जून खरगे यांनी माझ्यापेक्षा देशातील तरुणांना कोरोनाची लसीची अधिक गरज असल्याचे सांगितले.