चित मैं जिता पट तू हारा अशी भाजपची भूमिका - सचिन सावंत

March 01,2021

मुंबई : १ मार्च - “भाजप नेत्या चित्रा वाघ  यांचे पती किशोर वाघ यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अयोग्य; आणि क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या  मागे लावलेली ईडीची चौकशी योग्य. भाजपची ही भूमिका म्हणजे, चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे,” असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी लगावला. 

 “भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी तत्कालीन फडणीस सरकारने सुरु केली. त्यानंतर आता त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा म्हणजे सूडूबुद्धी. मात्र, क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे मोदी सरकारने ईडीची चौकशी लावली हे योग्य, भाजपची ही भूमिका म्हणजे चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे.” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेत सरकारवर दबाव टाकला होता. याच दरम्यान चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारणामुळे चित्रा वाघ यांच्या पतींवर सूडबुद्धाने कारवाई होत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या या दाव्याने राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. सरकारने भाजपच्या या दाव्याला फेटाळून लावले होते. त्यानंतर सावंत यांनी ही वरील ट्विट करत भाजपला पुन्हा धारेवर धरले.