पंतप्रधानसह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही टोचून घेतली कोरोनाची लस

March 01,2021

नवी दिल्ली : १ मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी स्वतः लस घेतली. त्यापाठोपाठ आता दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही कोरोना लस घेतली आहे.

65 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन CoWin पोर्टलवर सुरू झालं आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्वतः लस घेऊन आवाहन केलं. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली. "बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफस दिली जाईल." सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून दिली असल्याचं नितीन कुमार यांनी सांगितलं.